भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्ह्यात आगामी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जून-जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दुप्पटचा पाऊस झाला आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत ११० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. विशेष करून मंगळवारी जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी लागत असून, सोमवारी देखील जळगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगर,भुसावल सह सर्व तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पूर्वहंगामी कापसाला मोठा फटका बसला आहे. तसेच सोयाबीन पिकाचा देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!