भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये “सैराट” २६ वर्षीय तरुणाच्या खूनाने जळगाव हादरले..

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाइकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर कोयते आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, ही भयंकर घटना जळगाव शहरातील पिंप्राळा तर तो हुडको परिसरात रविवारी दि. १९ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यात त्याच्या कुटुंबातील सात जण ही जखमी झाले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून सासरच्या लोकांनी जावयावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली.

मुकेश रमेश शिरसाट. रा. भीमनगर, हुडको. या तरुणाने पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहामुळे पूजाच्या कुटुंबीयांमध्ये मोठा राग होता. त्यांच्या कथित प्रतिष्ठेला तडा गेल्याच्या रागातून या घटनेचा धक्कादायक शेवट झाला.

दी. १९ जानेवारी रविवार रोजी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी पूजाचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे व इतर नातेवाईकांनी त्याच्यावर कोयता, चॉपर व लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यामुळे मुकेशच्या मानेवर गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मुकेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ सोनू व इतर कुटुंबीय धावत आले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. या हल्ल्यात सोनूच्या हातावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या. त्याचप्रमाणे, मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांवरही शस्त्राने हल्ला करण्यात आला.

रामानंदनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच पूजाच्या कुटुंबीयांपैकी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सतीश केदार व इतर सात जणांना अटक केली आहे. मुकेशच्या चुलते निळकंठ शिरसाट यांनी सांगितले की, प्रेमविवाहानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुलीचे कुटुंबीय सतत बदला घेण्याच्या तयारीत होते. रविवारी मुकेश एकटा असल्याची संधी साधून त्याची निघृण हत्या करण्यात आली. मुकेशचे भाऊ सोनू शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी मुकेशला धमकी दिली होती की, “तू पळून जाऊन लग्न केले; आता तुझ्या कुटुंबालाही संपवू.” या भांडणादरम्यान त्यांनी मुकेशवर जीवघेणा हल्ला केला.  या क्रूर घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रोश करत हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाठ यांच्या पत्नी, आई आणि बहीण यांनी दिला आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

याच प्रकरणी काही जणांनी मिळून सोमवारी दि. २० जानेवारी रोजी संशयित आरोपींचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सकाळी १० वाजता जाळपोळ होत असल्याची माहिती मिळाल्याने विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पथक घटनांसाठी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!