गौण खनिज गैरव्यवहार आणि वाळूच्या बोगस पावत्या प्रकरणाची कारवाई कधी होणार ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने गौण खनिज गैरव्यवहार आणि वाळूच्या बोगस पावत्यांच्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी सीईओंना तब्बल १७ वे पत्र दिल्याने या प्रकरणी कधी कारवाई होणार ?
गौण खनिज गैरव्यवहारात–
शासकीय कामांमध्ये गौण खनिजांचा गैरव्यवहार करत वाळूच्या बोगस पावत्या लावून बिले काढणे, याप्रकरणी जी.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये तक्रारीत तथ्य असल्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एल. पाटील यांनी जिल्हाधिकार्यांपुढे मान्य केले होते. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले असतांना ही या संदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एल. पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडुन कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याची तक्रार पल्लवी सावकारे यांनी केली आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा ७ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्र दिले, महत्त्वाचे म्हणजे सौ. पल्लवी सावकारे यांनी कारवाईच्या मागणीसाठी दिलेले हे सतरावे पत्र आहे. यामुळे आता तरी त्यांच्या मागणीनुसार कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे…