भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

महावितरण कर्मच्याऱ्यांचे लक्ष असतं तरी कुठे…? नागरिकांचा जीव धोक्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव महानगरातील काही भागांमधे महावितरणाच्या पोलवरील फ्यूज बॉक्स सर्रास उघड़े आहेत. कर्मचाऱ्यांना या डीपी जवळ काहीना काही कामा निमित्त सदर डीपी जवळ यावे लागते ,तरी देखील कर्माचाऱ्यांचे लक्ष असते तरी कुठे , असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील हिराशिवा भागाच्या पूर्वेस महावितरणाची डीपी असून याठिकाणी असलेला फ्यूज बॉक्स जमीनीपासुन केवळ दिड फुट उंचीवर आहे. आणि आश्चर्य म्हणजे तो बंदिस्त नसुन चक्क उघड़ा आहे.
परिसरातील नागरिकांच्या सांगण्यानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून सम्बधित कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा सांगून झाले मात्र कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. घराबाहेर खेळतांना मुलांकडे सतत लक्ष ठेवावे लागते. खेळतांना चुकुन काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण… अशी विचारणा नागरिकां मधून होत आहे. विज प्रवाहाच्या कमी जास्त दाबामुळे आठवड्यातुन कमीत कमी 2/3 वेळा या परिसरात फ्यूज जात असतो तेव्हा मोठ्ठा आवाज होवून काहीवेळा येथे ठीणग्या देखील पडतात . यामुळे शेजारीच असलेल्या एका घर मालकांनी आडोसा म्हणून एक छोटी भिंत बांधून घेतली आहे.
तरी संबधीत विभागाने त्वरीत एकतर ह्या बॉक्सची उंची वाढवावी किंवा बॉक्सला कुलूप लाऊन बंद करता येईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!