भरधाव डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक भरधाव डंपरच्या धडकेत रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.
महामार्गावरील तरसोद फाट्यानाजीक एमएच १९ वाय-७७७३ क्रमांकाच्या डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भुसावळ तालुक्यातील कंडारी येथिल प्रेरणा देविदास तायडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला सदरील मृत महिला रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.