चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात आज २८५ कोरोना बाधित रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गेल्या मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यासह जिल्ह्यात आता कोरोनाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या १० दिवसापूर्वी ५ वर आढळून येत असलेली रुग्ण संख्या आता २०० च्यावर जात आहे. आज आढळून आलेल्या रुग्णसंख्येनंतर जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे.