चिंताजनक ; जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूची सर्वत्र धास्ती असताना येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नववर्षाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज संध्याकाळीच नववर्ष आणि अन्य कार्यक्रमांसाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाकडून कोरोना अहवाल जाहीर करण्यात आला ,प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आल्याने जळगाव जिल्ह्याची चिंता वाढली.सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०२, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०३, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ८२६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १८ रुग्ण सध्या उपचार घेत आहे.