चिंताजनक ; जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख,आज ३९ कोरोना बाधित रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
जळगाव शहर – १७, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०९, अमळनेर-०१, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०४, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ९०६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.