भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

तरुणाची सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

व्हाट्सअपवर ‘आय मिस यु बेटा’ ठेवला स्टेटस

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील शिरसोली येथील ३२ वर्षीय तरुणाने सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी उघडकीस आली आहे. मोबाईलच्या व्हाट्स अपवर आत्महत्येबाबतदेखील त्याने स्टेटस ठेवला होता. त्यानुसार पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली असावी असे दिसून येत आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमोल प्रकाश धनगर (वय ३२ रा. अशोकनगर, शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. अमोलचा व्यवसाय हा बकरी चारण्याचा आहे. त्यातून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होता. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपायला जायाचा.

शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते. तो घरी झोपला होता. रविवारी सकाळी ६:३० वाजता वडील प्रकाश धनगर घरी आले. त्यांना अमोल हा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. गल्लीतील लोक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

अमोल याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्याने सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून मी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमुद केले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात १मुलगा २ वर्षाचा वेदांत, १ मुलगी ४ वर्षाचा तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ आहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.

काय म्हटले आहे सुसाईड नोट मध्ये ?
आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कारण माझी सासूबाई आणि सासरा रा. रत्नपिंप्रीचे आहे. ते मला फार त्रास देतात आणि फोन वरती धमकी पण. म्हणून मी माझी जिवन यात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती.
माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!