दोन चिमुकल्या बहिणींवर तरुणाचा लैगिक अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दोन चिमुकल्या बहिणींवर तरुणाने घरात जावून लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवार, २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावातच राहणारा तरुण मुलींच्या घरी गेल्या. यादरम्यान त्याने दोघां चिमुकल्या बहिणीसोबत अश्लिल चाळे करत दोघांवर लैगिंक अत्याचार केला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन याप्रकरणी अत्याचारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे करीत आहेत.