जि.प. च्या अवैध गौणखनिज प्रकरणी ठेकेदारांवर गुन्हे दाखल होणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी बनावट पावत्यांच्या आधारे अवैध गौणखनिजाचा वापर केल्या प्रकरणी अखेर जि.प. सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
जळगाव सह भडगाव ,पाचोरा व एरंडोल या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी १४ ठेकेदारांनी रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांच्या वापर करून शासनाला चुना लावल्याचे हे प्रकरण जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले असून
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यात १४ ठेकेदारांचा समावेश असल्याने जि.प. मध्ये खळबळ उडाली आहे. तर, जिल्हा परिषदेच्या जलसिंचन विभागातील गौण खनिज घोटाळा खूप गाजत असताना यावर आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.तसेच लघुसिंचन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचार्यांवर देखील कारवाईची शक्यता आहे. या प्रकरणी आता केव्हा व कोनाकोणावर गुन्हे दाखल होणार अधिकारी कोण?व ठेकेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.