ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेचा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, जिल्हा परिषदेत खळबळ !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांची चौकशी सुरु आहे.
एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. इतर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून जळगाव एसीबीचे पथक माहिती घेत आहे. तर एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील कारवाई करीत आहे.