क्राईमयावल

महिलेची छेड काढल्याच्या कारणाने परस्परविरुद्ध तक्रार दाखल !

यावल (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या साकळी या गावी महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत आरोपी आणी फिर्यादी यांनी परस्परांच्या विरूद पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील साकळी येथील भोईवाडयात राहणारा गौरव पुरूषोत्तम माळी (वय २५ वर्ष) याने याच परिसरात राहणार्‍या एक महीला सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर धूतलेल्या तांदुळाचे पाणी फेकण्यास गेली असता तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या कारणा वरून महीलेने यावल पोलीसात फिर्याद दाखल केली. त्या विरुद्ध गौरव पुरूषोत्तम माळी याने सुद्धा यावल पोलिसस्टेशनला फिर्याद दिली त्याने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की गावातील राहणारे सद्दाम रसुल पिंजारी, बाबा शाहरूख (रा. ग्रामपंचायत जवळ), तौसीफ गुलाम शेख (रा. अक्सानगर), अल्लाउद्दीन शेख, आदील गॅरेजवाला व अल्तमश ईकबाल शेख (रा. भोईवाडा साकळी) यांनी माझ्या घराचा दरवाजा तोडुन मला बेदम मारहाण केली असे नमूद केले असून यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.त्या नुसार पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करीत असून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी आज तात्काळ घटनास्थळी भेट देवुन सर्वधर्मीय बांधवांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता गावातील शांतता व एकात्मता कायम राखावी असे आवाहन यावेळी केले. बैठकीस जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवीन्द्र पाटील यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!