भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकाराजकीयरावेरसामाजिक

सावदा राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या पाठपुराव्यानंतर आमदार निधीतून जलकुंभाचा मार्ग मोकळा !

सावदा (प्रतीनिधी)। सावदा शहरातील जलकुंभ फार जुने असल्याने पडत असून त्याचे बांधकाम फार जुने असून सद्या स्थितीत ते खुपच जीर्ण झालेले आहे त्यामुळे दुरुस्ती करून वापरता येणार नाही म्हणून नविन जलकुंभासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आमदार पाटील यांना देण्यात आल्याने निधी उपलब्ध तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सावदा नगरपरिषदेने सर्व साधारण सभा ठराव क्रमांक ६२ दिनांक ३१/०७/२०२० नुसार सदरचा जलकुंभ पाडून नवीन बांधकाम करणेबाबतचा ठराव पारीत केलेला आहे, सावदा नगरपरिषद जवळ ०.४५ एमएलडी क्षमतेचा एक जलकुंभ सन १९७१ रोजी बांधकाम केलेला असून त्यास सुमारे ४९ वर्षे होवून गेलं आहे. सदरील जलकुंभ नवीन बांधकाम झाल्यास सावदा शहरातील नागरीकांच्या पिण्याचे पाणी साठवण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच सदरील काम लोकाभिमुख असल्याने जलकुंभाचे काम त्वरीत हाती घेण्यात येवून पूर्णत्वास आणणे आवश्यक आहे.जलकुंभासाठी लागणारा निधी रक्कम रूपये ६५ लाख निधीची आवश्यकता असल्याने आपण आपले निधीतून वा इतर योजनेतील निधी प्राप्त करून दिल्यास जलकुंभाचे काम हाती घेता येईल अशा आशयाचे निवेदन सावदा येथील राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी आ.चंद्रकांत पाटील यांना दिले या वेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण, सिध्दार्थ बडगे, किशोर बेंडाळे , सौ.विजया जावळे, नाराबी शेख इश्तीयाक बागवान , सौ.मिनाक्षी कोल्हे, सावदा विश्रामगृह येथे या बैठाकित नगरसेवाकंस
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष कुशल जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुका अध्यक्ष साईराज वानखेडे व ईतर मान्यवर उपस्थित होते, तरी पालिका प्राशासने पुढील कार्यवाही गतीमान करावी अशीआशा व्यक्‍त केली जात आहे.

आमदार यांनी तत्काळ उपलब्ध करुन दिला निधी- या वेळी एक जलकुंभ जीर्ण झाल्यामुळे त्याचा वापर बंद करावा लागल्याने सावदा शहरातील सामान्य जनतेला पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत होते या प्रश्‍नाच्या उत्तरावर समाधान म्हणून दुसरा जलकुंभ तत्काळ उभा करणे परंतु पालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत सिमित असल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावर आमदार यांनी लागलीच निधी उपलब्ध करून दिला व सर्वसामान्य जनतेला पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळवून दिला म्हणून समाधान व्यक्त केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!