मुलींना ठार मारण्याची धमकी देत २९ वर्षीय विवाहितेवर अत्याचार
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। २९ वर्षीय विवाहितेवर मध्यरात्री तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात दि.३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २९ वर्षीय विवाहिता भाड्याने राहात असलेल्या घरात २५ वर्षीय तरुण जबरजस्ती घुसून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवले. जर ही घटना कुणाला सांगितली तर तुझ्या दोन्ही मुलीना ठार मारून टाकेल, अशी धमकी देखील यावेळी पीडित महिलेला दिली. या बाबत विवाहित महिलेने जामनेर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.