जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा -मराठा महासंघाची मागणी
जामनेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी । आज दिनांक- 20 एप्रिल रोजी जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे6 यासाठी आज दिनांक- २० एप्रिल रोजी जामनेर तालुका मराठा महासंघातर्फे जामनेर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यां तर्फे नगरपरिषदेचे रविकांत डांगे यांनी यांनी निवेदन स्वीकारले.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास यावर्षी ३५० वर्षें पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या साठी एक प्रेरणादायी जीवन चरित्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जामनेर शहर व तालुक्यातील शिवभक्तांची मागणी आहे , जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे, परंतु अद्यापही ती पूर्ण झालेली नाही.
महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत आहे.या शुभ मुहूर्तावर पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन करून पुतळ्याचे काम लवकरात-लवकर सुरू करण्यात यावे. या साठी जामनेर नगर परिषद समोरील जागेत किंवा B.O.T कॉर्नर परिसरात तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात यावे,अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ जामनेर तालुका पुतळा उभारणी चे काम हाती घेतल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिला आहे.या वेळी युवक अध्यक्ष -अशोक पाटील, तालुका उपाध्यक्ष-विनोद पाटील,तालुका कोषध्यक्ष- नवल पाटील,शहराध्यक्ष-भगवान खराटे,युवक कार्याध्यक्ष- दशरथ पाटील,भूषण कानळजे,प्रदीप काकडे, संदीप शेळके,दिपक पाटील,रमेश पाटील,बाळू पाटील,भगवान जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.