जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे सुविधा अभावी वाजले बारा – ठाकरे गटाच्या युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात युवासेना-शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांच्यासमोर युवासेना- शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचून निवेदन देण्यात आले.
जामनेर तालुक्याचे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोग्य सेवेच्या कामाने ओळखला जात असून येथील शासकीय रुग्णालयात सुविधा चा मोठा अभाव आहे. ठाकरे गटाच्या युवासेना शिवसेनेच्या वतीने जामनेर च्या शासकीय रुग्णालयात आज असंख्य समस्या त्यांच्या भोंगळ कामाचा आरसा प्रत्यक्षदर्शी दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे गटाने जामनेर या ठिकाणी केलेला आहे.
जामनेरच्या शासकीय रुग्णालयात आज असंख्य समस्या आहेत. सोनोग्राफी मशीन नाही. एक्स-रे काढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. रुग्णांची ओपीडी दिवसातून एकचं वेळा होते.रक्त तपासणी झाल्यानंतर वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. उपजिल्हा रुग्णालय असून ब्लड बँक नाही. अपघात झाला तर हाडांचे डॉक्टर नाही. महिलांच्या तपासणीसाठी स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नाही. नेत्ररोग तपासणी साठी नेत्ररोग तज्ञ उपलब्ध नाही. स्वच्छता,वार्ड बॉय, ड्रेसर कर्मचारी उपलब्ध नाही, अशा अनेक समस्या या उपजिल्हा रुग्णालयात आहेत.
शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मोफत, एक्स रे ५० रुपये नाममात्र फी,अपघात झाला तर कमीतकमी खर्च होतो,परंतु आज या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध नाहीत तसेच अपघात झाला तर अर्थोपेडिक्स डाक्टर सुद्धा उपलब्ध नाहीत स्त्री रोग डॉक्टर उपलब्ध नाहीत.
लागलीच या समस्या शासन दरबारी मांडा व ८ दिवसाच्या आत उपजिल्हा शासकीय रुग्णालय सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून सुरू करा. अन्यथा ८ दिवसाच्या नंतर आम्ही आपल्या भोंगळ कारभाराच्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसणारं आहोतं असा राहुल चव्हाण युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी इशारा दिला असून आंदोलन प्रसंगी तालुका प्रमुख-ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, विशाल भोई,शामराव पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील शेख उस्मान शेख अब्दुल शेख, सईद शेख इब्राहिम शेख, अलीम शेख मनोहरिन, प्रकाश सूर्यवंशी, जनार्दन पाटील ,प्रशांत सुरवाडे सुपडू माळी आदि शिवसैनिक उपस्थित होते.