भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेरशैक्षणिक

ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ जामनेर च्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयास शासनाची मान्यता

जामनेर,ता.जामनेर. प्रतिनिधी, करण साळुंके। जामनेर शहरातील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर ता.जामनेर जि.जळगाव या कनिष्ठ महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे विभागीय मंडळ,नाशिक यांच्या परवानगीने नुकतेच “केंद्र क्र.०८६६ जामनेर – क“ या केंद्रास मान्यता मिळाली असून केंद्रावर एकूण १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. त्यावेळी विद्यालयाचे/केंद्राचे केंद्र संचालक श्री.विष्णू काळे साहेब व प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

शासनाच्या दि.१४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार “कॉपी मुक्त व तणाव मुक्त”वातावरणात आमच्या केंद्रावर जामनेर शहरात कॉपी दाखवा व १००० रु.मिळवा हे ब्रीद लक्षात घेऊन नियोजन केलेले आहे. सदर संस्थेचे अध्यक्ष ना.गिरीष भाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री,वैद्यकीय व युवक कल्याण क्रीडा मंत्री,महाराष्ट्र राज्य)व संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई महाजन तसेच जेष्ट संचालक श्री.शिवाजी सोनार, प्राचार्य राजेंद्र सोनवणे व सर्व संचालक मंडळ यांच्या सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!