बोगस बियाणे व खते विकणाऱ्या दुकानदार व कंपनी वर तात्काळ गुन्हे दाखल करा- युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.यावर्षी सरकारने कापसाला भाव दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली गेली. या दुःखातून शेतकरी बाहेर पडत नाही. तो लागलीच पेरणीनंतर त्याच्या वर बोगस बियाणे व खते यांनी संकटात टाकण्याचे काम केलेले आहे.
जामनेर तालुक्यातील कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे व खते विकली गेली.त्यामुळे शेतकऱ्यांला कपाशी,सोयाबीन,मिरची या पिकांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बोगस बियाणे दिल्यामुळे आज पिकांची वाढ होत नाही.कपाशी लाल,पिवळी, काळी पडतं आहे त्याबरोबर पिकांची वाढ सुध्दा खुंटली आहे. बोगस खतांमुळे पीक अक्षरशः जळून गेलेली आहेतं. त्यामुळे बोगस बियाणे व खते विकणाऱ्या कंपनी व कृषी केंद्रावर तात्काळ गुन्हे दाखल करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने प्रयत्न न करता अंमलबजावणी करा असल्या आशयाचे निवेदन जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
या कृषी कंपन्याच्या CSR फंडमधून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी केले आहे. तोंडापुर,फत्तेपुर,शेंगोळे,मोयखेडा,सामरोद परिसरातील असंख्य शेतकरी जामनेर युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण व शहर प्रमुख अतुल सोनवणे सहभागी होते.