भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

बनावट जन्मदाखला प्रकरणी मुख्याध्यापिकेला ३ वर्षे सक्तमजुरी

जामनेर,जि जळगाव मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क। बनावट जन्म दाखला सादर करून सेवेचे वर्ष वाढवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बुधवार २९ रोजी जामनेर न्यायालयाने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील याना ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली .

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील या नियम व वयोमानानुसार सन २०१५ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. परंतु त्यानंतरही त्यांनी सेवेत कायम हजर राहून शासकीय लाभ प्राप्त करण्याच्या गैरहेतूने प्रतिज्ञापत्रात जाणीवपूर्वक खोटी जन्मतारीख नमूद केली होती. सदर जन्म दाखला त्यांनी जामनेरचे तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून प्राप्त केल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी शिक्षण संस्थेने जामनेर येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची सुनावणी तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या प्रकरणाची सुनावणी आज जामनेर न्यायालयासमोर झाली.

या प्रकरणात सरकारी वकील ॲड.कृतिका भट यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष घेतली यात नरेंद्र भिकनराव पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असून शासनाची दिशाभूल करणारा आहे असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामनेर न्यायालयाने मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील यांना दोषी धरत ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्या. दि.न चामले यांचे न्यायासनासमोर सदर खटला चालला. खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड.रवींद्रसिंह देवरे व ॲड. अनिल सारस्वत यांनीही काम पाहिले. तर त्यांना ॲड..प्रसन्न पाटील यांनी मदत केली. तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!