मीरा व आशा हॉस्पिटल मध्ये झालेल्या डिलिव्हरी व गर्भपाताच्या चौकश्या करून गुन्हे दाखल करा – मनसे ची मागणी
जामनेर,ता.जामनेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी,करण साळुंके। जामनेर येथील मीरा हॉस्पिटल व न्यू आशा हॉस्पिटल मधील अवैध गर्भलिंग तपासणी , नॉर्मल डिलीव्हरी ,सिजर व अवैध गर्भपात यांच्या माहिती अधिकारात समोर आलेल्या आकडेवारी च्या अनुषंगाने व तेथील सोयी सुविधा ची चौकशी करून गुन्हे दाखल करणे ची मागणी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांचे कडे निवेदन देत केली आहे.
गेल्या काही दिवसात जामनेर तालुक्यातील वैध व अवैध गर्भपात संदर्भात अनेक तक्रारी ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त होत असल्याचे अनुषंगाने तालुक्यातील गर्भपात संदर्भात आकडेवारी ची माहिती अधिकारात उपलब्ध माहिती अनुसार धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून जितक्या नॉर्मल व सिजर डिलीव्हरी ची संख्या नाही त्यापेक्षा जास्त ची संख्या ही गर्भपात संबंधी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे . त्यात रुग्णाकडून कायद्याने गर्भलिंग तपासणी व गर्भपात करणे गुन्हा असल्याच्या नावाचा धाक दाखवून 30 ते 40 हजार रुपयांची आर्थिक लूट व कायद्याने फसवणूक होत असल्याच्या तालुकाभर चर्चा रंगत आहे त्यात आलेल्या तक्रारी व माहिती नुसार वरील दवाखान्याच्या वारंवार तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत असल्याने कायद्याचा धाक व समाजातील अवैधरित्या गर्भपाताच्या समस्येवर तात्काळ ब्रेक लागावा व संबंधित दवाखान्यावर प्रशासनाचा वचक असावा या कारणास्तव उपलब्ध ऐकीव माहितीत काही अंशी सत्यता असावी या अनुषंगाने जामनेर शहरातील मीरा हॉस्पिटल व न्यू आशा हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा व कर्मचारी व डिलीव्हरी तसेच वैध व अवैध गर्भलिंग तपासणी व गर्भपात ची तात्काळ चौकशी करण्यात यावी .
या संबंधित दवाखान्यात चौकशी अंती सत्यता आढळून आल्यास या हॉस्पिटल ला टाळे ठोकण्यात यावे .अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात मनसे स्टाईल ने अवैध गर्भलिंग तपासणी व गर्भपात संदर्भात तालुक्यात गौप्यस्फोट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असा सज्जड दम च मनसे ने दिला आहे. मीरा हॉस्पिटल व आशा हॉस्पिटल यांची तात्काळ चौकशी होईस्तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर २८ फेब्रुवारी , मंगळवारी ठीक 12 वाजेपासून जामनेर तहसील कार्यालया समोर पुढील मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.
१) जामनेर शहरातील मीरा हॉस्पिटल व आशा हॉस्पिटल यांच्या नार्मल डिलिव्हरी , सिजर तसेच वैध व अवैध गर्भलिंग तपासणी व गर्भपात यांची सी सी टीव्ही फुटेज च्या आधारावर तात्काळ चौकशी करून दोषी आढळून आल्यास संबंधित हॉस्पिटल यांच्यावर गुन्हे दाखल करणे बाबत…..
२) अवैध गर्भलिंग तपासणी व गर्भपात बाबत तालुक्यात पाहणी पथक नेमण्यात यावे….
३) सिजर च्या नावाखाली तालुक्यातील रुग्णांची आर्थिक लूट थांबावी म्हणून शासकीय अधिकारी यांनी संबंधित हॉस्पिटल यांच्यावर वचक ठेवणे बाबत…
४)महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत डिलिव्हरी चा समावेश करून लाभ देणेबाबत…
५) गर्भधारणा व गर्भपात बाबत तालुक्यातील आशा सेविका यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक यांनी दरमहा अहवाल मागवावा व संबंधित हॉस्पिटल यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे . तहसीलदार अरुण शेवाळे यांचे कडे अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी केली आहे.