६ जून रोजी शासकीय कार्यालयात प्रमाणित स्वराज्य भगवाध्वज जी.आर. नुसारच फडकवावा- राहुल चव्हाण युवासेना उपजिल्हाप्रमुख
जामनेर, ता.जामनेर,मंडे टू मंडे न्युज
वृत्तसेवा। शासकीय परिपत्रकांनुसार ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. ६ जून शिवस्वराज्य दिन हा खालील प्रमाणे साजरा करण्यात यावा. तसेच सदर सूचना आपल्या अधिनस्त पंचायत समिती, ग्रामपंचायत ताबडतोब कार्यालयांना देण्यात यावी.
भगवा स्वराज्य ध्वज हा उंच प्रतीचे सेटिंग असलेली भगवी जरी पताका असावी ध्वज हा तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी हा जिरे टोक सुवर्ण होऊन जगदंब तलवार शिवमुद्रा वाघ नखे या शिवरायांच्या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत असावा असा आदेश महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. परंतु काही ग्रामपंचायती आणि शासकीय कार्यालयांमध्ये या भगव्या स्वराज्य ध्वजाची वेगळी ब्लॅक प्रिंट केलेल्या ध्वजाचे पूजन केले जात आहे. त्यामुळे शासनाने दिलेली भगवा स्वराज्य ध्वज संहिता याचा अवमान न होता सगळीकडे आपण आजच ताबडतोब आदेश जारी करावा.
निवेदन देते प्रसंगी नरेंद्र धुमाळ (युवासेना तालुका प्रमुख), विशाल भोई (जामनेर शहर प्रमुख), विजय पाटील ( काँग्रेस उपाध्यक्ष) ,रवी चोपडे (काँग्रेस शहर अध्यक्ष), रतन सिंग राणा (करणी सेना जामनेर तालुका अध्यक्ष) उपस्थित होते…..