राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर फलक अनावरण करा- जामनेर युवासेनेची मागणी
जामनेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी -करण साळुंके। जामनेर शहरातील जळगाव रोड वरील ‘शिवाजी नगर’ भागाचे नाव “राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर” हे करण्यात आलेले आहे.परंतु अध्याप ही दुरुस्ती झालेल्या नामकरणाचे फलक (बोर्ड) त्या ठिकाणी लावलेले नाही. नगरपालिका सांगण्यानुसार त्यांनी 28-11-2022 रोजी ठराव पास केलेला होता.पण “इतका वेळ कुठं पाणी मुरलं कळलं नाही. असा सवाल वंदन मातृभूमी प्रतिष्ठान संघटनेने केला आहे.
त्यानंतर 07-02-2023 रोजी “वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण” ने नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यामुळे नगरपरिषद मार्फत 15 फेब्रुवारी रोजी तो ‘ठराव कऱण्यात आला. त्या नंतर 19 फेब्रुवारी रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने हे फलक अनावरण करण्यात येईल.परंतु अध्यापही ते “फलक अनावरण” झालेले नाही.
त्यामुळे युवासेना उपजिल्हाप्रमुख व वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण चे राहुल भाऊ चव्हाण यांनी 8 दिवसाचा वेळ नगरपरिषद चे मुख्याधिकारी- चंद्रकांत भोसले, तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेला आहे.
8 दिवसांत नामकरणाचा फलक (बोर्ड) या ठिकाणी नाही लागला.तर जामनेर नगरपालिका कडे निधी उपलब्ध नाही त्यांच्याकडील निधी संपलेला आहे व इतकं छोटं आणि अत्यंत महत्वाचे काम अनेक दिवसापासून ठरवून प्रलंबित आहे.असं समजून आम्ही सर्व “शिवप्रेमी व शिवभक्तांच्या सहकार्यातून शहरात देणगी मागून हे नामकरण फलक” (बोर्ड) या ठिकाणी उभं केल्याशिवाय शांत बसणार नाही,असा इशारा “वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण” चे राहुल भाऊ चव्हाण यांनी दिला असून या वेळी संघटनेचे पद अधिकारी अमर पवार सर पवन माळी, विशाल भोई ,राकेश पाटील, अनिल पाटील ,मोहन जाधव, विशाल चवरे ,केतन मराठे, किरण मोरे, राजेश धनगर, सागर माळी ,करण माळी, शुभम घोलप ,विशाल सपकाळ ,आधी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.