भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

पहुर येथे युवासेनेने केले तेरावं व पिंडदान…….

जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्व शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, या मंत्र्यांचे पहुर येथे युवासेनेने केले तेरावं व पिंडदान केले, कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे.

कपाशीची भाववाढ व शेतकऱ्यांना बियाणे-खते सुद्धा भाव वाढवून दिले जात आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी मंत्र्यांचे तेरावे व पिंडदान करून बुंदी वाटून आज पहुर येथे युवासेनेने अनोखे आंदोलन केले. या अवकाळी सरकारने जर २ दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर युवासेना या पाचही मंत्र्यांच्या घरी कापसाची राख पाठवल्या शिवाय स्वस्थ राहणार नाही असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिला आहे.


आंदोलन स्थळी तालुकाप्रमुख नरेंद्र धुमाळ, पहुर युवा सेना शहर प्रमुख शुभम बारी, विशाल भोई, सागर साठे, संजय तायडे, शांताराम गोंदनखेडे, सईद शेख इमरान शेख, अंकुश जोशी, स्वप्निल पाटील,मनोज मिस्तरी, विजू जोशी राज जोशी काशिनाथ शिंदे,उस्मान भाई,आलिम शेख, शंकर राजपूत जगदेव बोरसे विलास पाटील,डॉ. सोपान पाटील, दिपक डोंगरे आदि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते…….

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!