क्राईमजामनेर

जामनेरात महिलांची छेड; दोन गटात तुफान हाणामारी !

जामनेर- शहरात शुक्रवारी महिलांसमोर तरूणांचा एक गट विवस्त्र पोहत असल्याचा कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली
 

कांग नदीकाठीच्या ओझर गावातील काही तरूण गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात पोहोण्यासाठी येत होते. तर महिला नदीवर धुणी, भांडी करणार्‍यासाठी नेहमी येतात. यापैकी काही तरूण विवस्त्र अवस्थेत पोहोत असल्याची महिलांची तक्रार होती. एवढेच नावही तर छेड काढत असल्याचे काही तरुणींनीची तक्रार होती. दरम्यान, शुक्रवारी याच टारगट तरूणांनी ओझर येथील तरुणींची छेड काढली. यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. हाणामारीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका गटाचा जमाव पोलीस स्थानकात आल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचे कळते. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत जामनेर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!