आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। १७ वर्षीय अल्पवयीन मुलींशी बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचे
व्हिडीओ चित्रीकरण करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघळकीस आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जामनेर येथील घरकाम करणार्या १७ वर्षाच्या तरूणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर याप्रसंगी त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण केले ,या नंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी, रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर, याने व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत
१२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याबाबत दोघ नराधमांसह त्यांना मदत करणार्या आणखी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.