लाचखोर महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटरला एसीबी कडून अटक
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर लावून देण्यासाठी १५०० रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीच्या टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी याना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे करण्यात आली असून या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
फत्तेपूर येथील रहिवाशी असलेला तक्रारदार याने त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद पवार सह खासगी पंटर कलीम तडवी या दोघांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते. मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली.
त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने आज बुधवारी १९ एप्रिल रोजी दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात अटक करण्यात आली
कारवाई शशिकांत पाटील डीवायएसपी जळगाव ,व. स.फौ./दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ ,स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील,पो.कॉ.राकेश दुसाने , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.यांनी सहभाग घेतला.