जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस बेड्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जामनेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील पहुर येथे राहणाऱ्या एका ६ वर्षीय बालिकेला फूस लावून उचलून नेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील पहुर येथील अकबर युसूफ तडवी (वय-४०) रा. खंडेराव नगर पहूरपेठ याने १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील एका ६ वर्षीय पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली असतांना त्यावेळी मुलीला फुस लावून उचलून नेत गावातील एका निर्जन ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अकबर तडवी याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार अन्वये पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.