जामनेर तालुक्यात गावागावांत ३५० वा शिवराज्याभिषेक साजरा करा – युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण
जामनेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। जामनेर तालुक्यातील युवासेनेचे संघटनात्मक कामाची घौड-दौड पाहता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन युवासेना जामनेर तालुक्यात करत आहे.
आज रोजी युवासेनेच्या बैठकीत २ जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा करा गावातील सर्व समाजाचा सहभाग होईल असा प्रयत्न करा.प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावण्याचे आवाहन युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. हा दिवस "हिंदू साम्राज्य दिन" म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जामनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिली.
रात्री दिपोत्सव साजरा करावा-
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेष्ठ शुद्ध प्रयोदशी १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतः राज्याभिषेक करून घेतला. यावर्षी या ऐतिहासिक घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत आहे. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास स्मरण व्हावा यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची योजना राबविण्यात आली आहे. त्यासोबतच “मातृ शक्तीने” शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आपल्या दारात रांगोळ्या काढाव्यात व दिवे लावून दीपोत्सव म्हणून हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा.
वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम युवासेनेच्या माध्यमातून पार होणारं आहेतं.
बैठक प्रसंगी मार्गदर्शक युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी केले. तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ,शहर प्रमुख विशाल भोई,उप-शहर प्रमुख सईद शेख,मयुर पाटील,अनिल चौधरी, भूषण कानळजे,कृष्णा चोरमारे, योगेश गोसावी, सागर साठे, विशाल सोनवणे,किसन मोरे,
अमोल रोकडे,प्रशांत सुरवाडे, इम्रान शेख,विशाल सातवे, शांताराम काळे,अंकुश जोशी, दिपक जोशी, अलिन शेख,
उमेश जोशी,अमोल जोशी,राज जोशी,अक्षय राजपूत, अनिल चौधरी, सुभाष शिंदे,अतुल पाटील,संग्रामसिंग पाटील,राहुल चौधरी, अनिल सूर्यवंशी, सुनील ठाकूर इ. युवासेना कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते…..