शेंदुर्णीत विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे भव्य मूक मोर्चा
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। देशात ज्या काही जिहादी कारवाया व हिंदूच्या होत असलेल्या क्रुर हत्या आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या धमक्यांना वेळीच पायबंद घालणे त्यासाठी विहिंप च्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजातर्फे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीत आज भव्य मूक मोर्चा काढून त्याचे निवेदन पहूर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना देण्यात आले.
मुक मोर्चा साठी वारकरी संप्रदाय , गणेश मित्र मंडळ ,दुर्गा मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच राजकीय मंडळी ,गावातील पत्रकार सर्वांनी उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दिला .या मूक मोर्चाचा समारोप संघांचे कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायातील ह भ प श्री कन्हैया महाराज यांनी केला, मोर्चा ला प्रमुख उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री अतुल पाटील,बजरंग दल प्रखंड संयोजक घनःश्याम माळी,सहसंयोजक पप्पू वाघ व विक्रम माळी, भूषण अस्वार, प्रज्वल सूर्यवंशी, वैभव फुसे ,प्रज्वल सूर्यवंशी, शुभम कासार दीपक धनगर ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका संघचालक उमाकांत भगत , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर मंत्री मोहित चौधरी, भाजपा तर्फे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, नगरसेवक सतीश बारी, शरद बारी, शिवसेनेचे शहर प्रमुख भैय्या सूर्यवंशी डॉ. सुनील अग्रवाल,आदीसह बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते व बजरंग दल प्रखंड संयोजक घनश्याम माळी यांनी प्रेरणा मंत्र म्हणून मूकमोर्चा चा समारोप केला.
आपल्या देशात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे.लव्ह जिहाद,लॅन्ड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत.संपूर्ण देशात पूर्वनियोजित पद्धतीने हिंदू समाजावर हल्ले केले जात असून टार्गेट किलिंग च्या घटना सुद्धा उघळकीस आल्या आहेत,ह सम्पूर्ण प्रकार पाहता हादेश राज्य घटनेने चालेल की झुंडशाहीने?असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिंदू समाजावर आक्रमण केले जात असून कन्हैय्यालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्या या जिहादी तत्वानीच केल्या आहेत.याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे आणि स्वतः हिंदूंना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा देश नक्की संविधानाच्या आधारे चालत आहे काय? हे कळत नाही, हे वक्त्यांनी सांगितले.