मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जामनेर: तालुक्यातील गोरखेडे येथे घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची मनाला चटका देणारी घटना मध्यरात्री घडली असून सदरील दुर्घटनेमुळे परिसरातुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहिती अशी, काल दि.१० तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व त्यांच्या पत्नी वैशाली उत्तम(वय ४०) हे आपल्या जामनेर तालुक्यातील गोरखेडा बुद्रुक येथील घरात झोपलेले असताना घरात भीषण आग लागलेली असल्याने घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षता आल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला, मात्र आगीची त्रिव्रता एवढी भीषण होती या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आला. सदरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.