जामनेर शहरात युवा सेनेने काढली कापसाची अन्यायात्रा-
…नाही तर सरकारच्या तेराव्याचा कार्यक्रम – राहुल चव्हाण
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खान्देश मधील जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पांढरे सोन म्हणून कापूस हे मुख्य पीक असून ते जवळ पास मागील सहा महिने पासून बाजार भाव नसल्याने मालास उठाव नसल्याने घरातच पडून आहेत. आपल्या भागातील जवळ पास सर्वच शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्था ला खिळ बसली आहे आणि आता नवीन हंगाम सुरू होणार असून त्यात शाळा सुरू होणार आहेत, तसेच पावसाळ्यात साथीची आजार पसरून दवाखाने खर्च वाढत असतो, त्या मुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रास सहान करीत असून तणावा खाली आला असून निराशेच्या गर्तेत सापडला आहे म्हणून आमची आजची ही अंत्ययात्रा मार्च शेतकऱ्यांच्या कापसाला वाढीव रुपये १६००० प्रती क्विंटल मिळावा. त्याबद्दल आस्था दाखवत सरकार चे लक्ष वेधण्यासाठी आहे…
आणि पुढीलप्रमाणे त्यासाठी आमच्या ५ प्रमुख मागण्या आहेत.
१) शेती ला मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर,नागर, बैलजोडी मशागत ,पंप,अवजारे, ठिबक संच,पाईप,मजुरी,बियाणे, खते,औषध फवारे,शेत माल काढणी चा खर्च, मजुरी, आणि शेतकऱ्यांना घरी उदरनिर्वाह करता लागणारा खर्च मागील दहा वर्षात जवळ पास चौपाट ने वाढला आहे. त्या तुलनेत दहा वर्षा आधी ४००० रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी होत होता. तर येत्या पुढील हंगामात किमान १६,००० रुपये प्रति क्विंटल दराने सरकार ने राज्यातील “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या” मार्फत कापूस खरेदी करण्याची लेखी हमी द्यावी.
२) जर केंद्र आणि राज्य सरकार ला कापूस पिकास प्रती क्विंटल १६,००० रुपये भाव देणे शक्य नसल्यास मदत म्हणून महगाई भत्ता सारखे प्रती एकर ५,००० रुपये अनुदान पेरणी करताना १५ जुन चा आत शेतकरी याना द्यावे जेणे करून त्याचे वरील भार कमी होईल
३) जर केंद्र आणि राज्य सरकार हमी भाव पण देऊ शकत नसेल आणि पेरणी पूर्व अनुदान पण देत नसेल तर राज्यातील शेतकरी ना ठिबक, अवजारे, उत्तम बियाणे, रासायनिक खते, फवारे, हे ९०% सरकारी अनुदान वर शेती चा बांधावरच उपलब्ध करून देऊन शेत मजूर हे केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजना नुसार शेतकरी ना मजूर उपलब्ध करून द्या..
४) तालुक्यातील संपूर्ण शेतकरी बांधव आणि त्यांचा शेती चा विमा स्वतः सरकारे ने काढावा संपूर्ण पैसे है सरकार ने भरले पाहिजे आणि त्यानं सुरक्षा कवच दिले पाहिजे.
५) जामनेर तालुक्यातील ज्या गावाची लोकसंख्या दहा हजार वर आहे. अश्या प्रत्येक गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित गोदमे आणि बाजार समिती वर हमी भाव ने शेती माल खरेदी विक्री सरकारी यंत्रणा उभी करावी ,सुरू करावी जेणे करून भोळा – भाबडा शेतकऱ्यांची लूट होणार नाही कुणी त्याला अडून पाहणार नाही.
वरील फक्त ५ मागण्या असून जर हे राज्य सरकार ला शक्य नसल्यास त्यांनी जाहीर करावे. आम्हाला हे जमत नाही, शक्य नाही, आम्ही आपले या महाराष्ट्र राज्यातील ७ करोड पेक्षा जास्त शेतकरी ना न्याय देऊ शकत नाही .
या विषयी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची भाववाढ भूमिका घेतली नाही. “१३ व्या दिवशी पहुर येथे” या सरकार चे तेरावे घातल्या विना आम्ही स्वस्त बसणार नाही..
आंदोलनाप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी केले. तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ,शहर प्रमुख विशाल ज्ञानेश्वर जंजाळ, भैय्या गुजर, अतुल सोनवणे सुरेश चव्हाण मनोज मिस्तरी,प-शहर प्रमुख सईद शेख,मयुर पाटील,अनिल चौधरी, भूषण कानळजे,कृष्णा चोरमारे, योगेश गोसावी, सागर साठे, विशाल सोनवणे, शांताराम दांडगे
अमोल रोकडे,प्रशांत सुरवाडे, इम्रान शेख,विशाल सातवे, शांताराम काळे,अंकुश जोशी, दिपक जोशी, अलिन शेख,
अमोल जोशी,राज जोशी,राहुल चौधरी, अनिल सूर्यवंशी, सुनील ठाकूर इ. युवासेना कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते…..