अल्पवयीन मुलीला पळविले
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर तालुक्यातील एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोण्या अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघळकीस आली.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की,,जामनेर तालुक्यातील बेटावद येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दि. ४ जून रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ती घरी असताना तिला कोण्या अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले,मुलगी घरात नसल्याचे पाहून मुलीच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने जामनेर पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने त्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.