अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलांकडून विनयभंग
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १९ जुलै मंगळवार रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलगी राहात असलेल्या घरात अनधिकृत घुसून मुलीचा हात धरून तिला लज्जाउत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसस्टेशनला केल्याने भादवि कलम ३५४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.