क्राईमजामनेर

लाकूड वेचण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन अत्याचार

जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लाकूड वेचायला चल, असे सांगून अल्पवयीन मुलीवर जंगलासह आणि घरी वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय नराधमा विरुध्द जामनेर पोलिसात सोमवारी रात्री बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादि नुसार २० जुलै २०२२ रोजी ४ वाजेच्या सुमारास नन्हा नजाकत खान,४७, जामनेर, याने पिडीत मुलीला लाकूड वेचायला चल, असे सांगून जंगलात तिच्यावर अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची व आईला जंगलात फेकून देण्याची धमकी पीडितेला दिली होती. यानंतर पिडीतेची आई घरी नसल्याचा फायदा घेत संशयित आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने सोमवारी रात्री तक्रार दिल्याने नन्हा नजाकत खान याच्याविरुद्ध पोस्को सह बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!