मतदानाच्या पूर्वसंध्येला चाकू हल्यासह पिस्तुलीने धाक; दोन गटांमध्ये वाद
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवपिंप्री येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून रात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करत पिस्तुल रोखून धमकावल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणात क्रॉस तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद झाल्याने यात तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून एका गटाने दिलेल्या तक्रारीनुसार, यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत असल्याने भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत असल्या वेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी चंद्रशेखर शिंदे, सुरेश शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, नितीन पाटील, अमृत शिंदे, यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर निकम यांनी शाब्दीक वाद घातलत समर्थकांनी चाकूहल्ला करण्यात आला तसेच एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला यामध्ये नितीन सोनवणे हा जखमी झाला असल्याचे जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी ही दिलेल्या तक्रारनुसार त्यांचे समर्थक नितीन विकास पाटील यांच्यावर गावातच चाकूने हल्ला झाला असल्याने यामुळे नितीन सोनवणे यांनी डोक्याला मारून घेतले असून ते आमच्यावर हल्ला झाल्याचा खोटा बनाव करत असल्याचा आरोप निकम यांच्याकडून करण्यात आला आहे.