Breaking : पंचायत समितीचा लाचखोर कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज : गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झाल्यानंतर वर्क ऑर्डर साठी पंचायत समिती कार्यालय, जामनेर येथील कनिष्ठ लिपिकास ३ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने जिल्ह्यातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आरोपी वसंत पंडीत बारी, वय-५३, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक पंचायत समिती कार्यालय,जामनेर, राहणार शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव यांनी ३ हजार रुपयाची लाच आज १३ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय, जामनेर येथे स्वतः बसत असलेल्या कक्षात स्वीकारली म्हणुन लाच लुचपत विभागाच्या जळगाव पथकाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सापळा यशस्वी करणेकामी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.सुनील शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.