भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

“एक करोड भेज दे,नही तो बहुत बडा धमाका होगा”; ग्लोबल महाराष्ट्र हाँस्पिटलच्या सभास्थळी बॉम्बस्फोटाची धमकी; हा अज्ञात व्यक्ती कोण ?

जामनेर (प्रतिनिधी)। जामनेर येथे ग्लोबल हॉस्पिटलचे लोकार्पण होत असताना आमदार तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्विय सहायक दिपक तायडे यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवरील आलेल्या धमकीत ग्लोबल महाराष्ट्र हाँस्पिटलच्या सभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या आणी मॅसेजद्वारा एक कोटी रूपये खंडणी मागीतल्याच्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या धमकी बाबत जामनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असून दिपक तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज १३ रोजी बिओटी कॉम्प्लेक्समधे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतांना तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर दुपारी २ वाजता एक कॉल आला असता समोरून हिंदीत बोलणाऱ्याने सभाके चारो ओर बॉम्ब रखे है,ए बात आपको बता देता हु,आपको क्या करना है ये देखो । तर ३ वाजुन १८ मिनीटांनी टेक्स मॅसेज आला.
त्यात इंग्रजी व हिंदीत मजकुर असा, पाच बजेतक एक करोड भेज दे,महाजन को बोलदे, नही तो बहुत बडा धमाका हो जाएगा, मालेगांवमे मेरे आदमी खडे है,नही तो तुम्हारी मर्जी ।
अश्या प्रकारचा मजकुर असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कार्यक्रम संपल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दिपक तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आला आहे. हा अज्ञात व्यक्ती कोण या बाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून किशोर पाटील हे तपास करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!