भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

जामनेर तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जामनेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील अनेक गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने बेजार केले असून अनेक गावांसह शेती शिवारात पाणी शिरल्याने यामुळे मोठी प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील ओझर गावांमध्ये चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्व गावांमध्ये सुमारे १३० घरांची पत्रे उडाल्याचे प्रशासनाला प्राथमिक अंदाज सांगण्यात आले आहे. यासोबत मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि तिघ्रे वडगाव या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे. तर शेतीची नेमकी किती हानी झाली याची माहिती या विवरण पत्रात देण्यात आलेली नाही.

तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला आहे. यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे शासन स्तरावर तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे अशी नागरिकांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!