Jharkhand BJP Candidate List : भाजपकडून 66 उमेदवारांच्या यादीची घोषणा; 11 महिलांची लागली वर्णी !
भाजपने विधानसभा निवडणुकीसंदर्भात झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची मोठी घोषणा केली आहे. Jharkhand BJP Candidate List उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने 66 उमेदवारांच्या यादीत 11 महिलांना तिकीट दिले आहे. लोकसभेत पराभूत झालेल्या चार नेत्यांनाही पक्षाने तिकीट दिले आहे. झारखंडमधील जामतारा येथून भाजपने सीता सोरेन यांना तिकीट दिले आहे. (Jharkhand Assembly Election 2024)
भाजपने झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएममधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चंपाई सोरेन यांना सरायकेला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेन यांना घाटशिला विधानसभा मतदारसंघातून तर माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांना पोर्क मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान –
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 विधानसभा जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात 38 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे.
झारखंडमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे वेळापत्रक:
अधिसूचना – 18 ऑक्टोबर
नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर
नामांकन अर्ज पडताळणीची अंतिम तारीख – 28 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर
मतदानाची तारीख – 13 नोव्हेंबर
मतदानाचा निकाल जाहीर होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर
झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे वेळापत्रक
राजपत्र अधिसूचना प्रकाशन तारीख – 22 ऑक्टोबर
नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
नामांकन अर्ज पडताळणीची अंतिम तारीख – 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतदानाचा निकाल जाहीर होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा