भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

सत्तेच्या विरोधातला ‘आवाज’ म्हणजे पत्रकार होय – प्रा. वाडेकर

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती खडसे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी ” डिजिटल युगात पत्रकाराची भूमिका व आव्हाने ” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकमतचे पत्रकार व इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाळेतील कार्यरत प्रा. विनायक वाडेकर यांची विशेष उपस्थिती होती.


प्रा.वाडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ” डिजिटल युगात पत्रकाराची भूमिका व आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करताना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणून त्यांनी डोळसपणे वार्ता लेखन केले पाहिजे. त्याचबरोबर पत्रकार हा बोलक्या नायकाची भूमिका पार पाडणारा असला पाहिजे. पत्रकाराचे ज्ञान हे अद्यावत व शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे कारण पत्रकार हा समाजाचे व्यासपीठ असतो असे मौलिक मत व्यक्त केले. मार्गदर्शनच्या शेवटच्या टप्प्यात ते असे म्हणाले की, ‘सत्तेच्या विरोधातला आवाज म्हणजे पत्रकार होय’ कारण पत्रकारात समाजाचे व राष्ट्राचे प्रतिबिंब लपलेले असते अशी व्यापक भूमिका आव्हानात्मक स्वरूपात मांडली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.हेमंत महाजन यांनी आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचे भवितव्य आहे म्हणून विद्यार्थ्याने डिजिटल युगात आपण प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहून कुटुंब, समाज आणि राष्ट्र अबाधित ठेवण्याचे कार्य केले पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .संजीव साळवे व डॉ.वंदना चौधरी यांची विशेष उपस्थित होती. तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय डांगे, प्रा.डॉ. इस्माईल शेख व प्रा .डॉ. दत्तात्रय कोळी यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .एस. एस. गवळी यांनी केले तर प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मानसशास्त्राच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ.छाया ठिंगळे यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!