भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

पत्रकारांनी सामाजिक काम करीत असताना स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी, ओरिजनल पत्रकार संघाच्या आरोग्य शिबिरात डॉ. केतकीताई पाटील यांचा सल्ला

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिन (६ जानेवारी) निमित्त रावेर तालुक्यातील सावदा येथील ओरिजनल पत्रकार संघ, सावदा आणि गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून औपचारिकपणे शिबिराला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला सावदा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवून हजेरी लावली.

सत्काराचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक + पुष्पगुच्छाऐवजी सर्वांना वृक्ष रोपटे देऊन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला. सर्वांना वृक्ष रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासह सामाजिक जबाबदारीची उदाहरणे सादर करणारा ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ. सौ. केतकी ताई पाटील या होत्या. शिबिराचे उद्घाटक प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माननीय वैशाली दीदी, तर प्रमुख पाहुणे म्हणून सावदा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नगरपालिका गटनेत्या सौ. रंजनाताई भारंबे, डॉ. अजित पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगरसेविका सिमरन वानखेडे, नगरसेवक शाम अकोले,नगरसेवक सचिन बऱ्हाटे, सर्वश्री नगरसेवक नकुल बेंडाळे, विशाल सोनवणे, सिमा वेडू लोखंडे, पठाण फिरोज खान, सामाजिक कार्यकर्ते गजानन ठोसरे, गुड्डू मेंबर, सतीश पाटील, सारिका चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना, पत्रकारांनी सामाजिक काम करीत असताना स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी, असा मोलाचा सल्ला ओरिजनल पत्रकार संघाच्या आरोग्य शिबिरात या वेळी डॉ. केतकीताई पाटील यांनी दिला.

तसेच शिबिराच्या उद्घाटक ब्रम्हकुमारी वौशाली दिदी, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. विशाल पाटील आणि नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी सावदा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजक ओरिजनल पत्रकार संघाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला आणि आरोग्य जागृतीचे सत्र आयोजित करण्यात आले होते. शहरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आणि महिलांनी आरोग्याबाबत सहभाग घेतला गेला. या उपक्रमामुळे शहरवासीयांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीच्या महत्त्वाची आठवण झाली.

आरोग्य शिबिर ओरिजनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष दिलीप चांदेलकर, सचिव शेख फरीद, कार्याध्यक्ष युसुफ शहा, कैलास लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अजहर खान, दीपक श्रावगे, शेख मुखतार, प्रशांत सरवदे, अकरम खान, यांनी यशस्वीपणे पार पाडले. शिबिरास संतोष नवले, योगेश सैतवाल यांच्यासह रावेर – यावल तालुक्यातील पत्रकार, नगरसेवक, नागरिक, हजार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय महाजन सर यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित या आरोग्य शिबिराचे मुख्य उद्दिष्ट पत्रकार समाजातील सामाजिक जबाबदारीची आठवण करून देतानाच, समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरवणे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे आयोजक आणि सहभागींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!