जुक्टो पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी आज घेतली वेतन पथक अधीक्षकांची भेट
कुंभारखेडा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रा.योगेश कोष्टी | जळगांव जुक्टो संघटना पदाधिकारी प्रा.श्री. नंदन वळिंकार (अध्यक्ष), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष), प्रा.संजय पाटील (उपप्राचार्य नूतन मराठा ज्युनिअर कॉलेज), प्रा. स्वप्नील धांडे (कार्यकारिणी सदस्य जळगांव महानगर) यांनी आज मा.वेतन पथक अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यातील उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी चर्चिले गेलेले आहे.
१) गेल्या ५-६वर्षांपासून पी. एफ.हिशेब पावत्या मिळालेल्या नसून त्या नियमितपणे मिळण्यासाठी उचित कार्यवाही त्वरीत करावी.
२) माहे मे २०२६पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे जीपीएफ प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत.
३)थकीत वेतन, डी ए.वाढ फरक, वरीष्ठ/निवड श्रेणी फरक रक्कम मिळण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून सदर देयके अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.
४) वैद्यकीय देयके त्वरीत अदा करावीत.
५) एन.पी.एस.धारकांची मासिक वर्गणी नियमितपणे संबंधितांच्या खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच प्रलंबित वर्गणी तात्काळ जमा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
याबाबत योग्य ती कार्यवाही करून जिल्ह्यातील शिक्षकांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी जुक्टो संघटनेमार्फत करण्यात आलेले आहे


