भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अल्पवयीन भावा-बहिणीचा लैंगिक छळ,नातेवाईकच प्रेयसी- प्रियकरचे विकृत चाळे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

कल्याण,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कल्याणमध्ये विकृतीची कळस गाठल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रेयसी आणि तिच्या प्रियकराकडून अल्पवयीन भावंडांवर लैंगिक अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. प्रेयसीने 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला तर तिच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी प्रियकर-प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?
एक 23 वर्षीय तरुणी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. ही तरुणी पिडीत मुलाची नातेवाईक आहे. ही तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. या आरोपी तरुणीने मुलाच्या बहिणीला सांगितले की आपण दोघी मिळून तिच्या प्रियकरासोबत सुद्धा शय्या करायची. अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
हल्ली लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. कल्याण डोंबिवलीतही लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. पोलिसांनी या घटनेत कायदेशीर कारवाई केली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन तरुणीवर 33 जणांनी बलात्कार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सर्व आरोपीना अटक केली होती. डोंबिवलीतील ही घटना ताजी असताना लैंगिक विकृतीची एक विचित्र घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भावा बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, आमच्याकडे दोन वेगवेगळया तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येणार आहे. पिडीत आणि आरोपी हे नातेवाईक असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!