भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

आ. एकनाथराव खडसेंच्या दूरदृष्टीतुन साकारलेल्या कर्की-रामगढ तलावाने शेती परिसर समृद्ध– रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या अडतिसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील रामगढ-कर्की येथील ग्रामस्थां सोबत आज रोहिणी खडसे यांनी संवाद साधला.

महाराष्ट्र -मध्यप्रदेशच्या सिमा रेषेवर कर्की फाट्यापासून अवघ्या चार कि. मी अंतरावर डोंगराच्या कुशीत आदिवासी समाज बांधवाची रामगढ वस्ती आहे. या वस्तीपासून जवळच राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या दूरदृष्टीमुळे नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन रामगढ तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण लाभल्याने भविष्यात हे चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. जन संवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणी खडसे या तलावला भेट दिली.प्रसंगी या तलावामुळे कर्की परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. केळी उत्पादनामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. असे सांगून रामगढ येथील आदिवासी बांधवाना रहिवासी जागेपासून वीज,रस्त्याची सुविधा नाथाभाऊनी करून दिल्याने हा आदिवासी बांधव सुखावला असल्याचे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी रामगढ -कर्की येथील सभेत केले. यावेळी नाथाभाऊंनी गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात केलेल्या अनेकविध विकास कामांचा उहापोह केला.

नाथाभाऊंनी कधीच जाती -पातीचे राजकारण केले नाही. फक्त विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन त्यांनी सातत्याने विरोधकांना केले. ज्या नाथाभाऊनी भाजपा संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, त्यांनाच पक्ष सोडण्यासाठी पक्षाने मजबूर केले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत पक्षातीलच काही विश्वासघातकी लोकांनी केलेल्या दग्या फटक्यामुळे माझा थोड्या मतांनी पराभव झाला. म्हणूनचं त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आलेल्या समस्या निराकरण करण्याच्या हेतू आहे. यापुढे जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी स्वतः नाथाभाऊनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी पक्ष घरा घरात पोहचवून आदरणीय सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी या जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे असे रोहिणी खडसे यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष यु डी पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी सभापती विलास धायडे, राजेंद्र माळी, किशोर चौधरी, सुधिर तराळ, रामभाऊ पाटील, भागवत पाटील, प्रकाश पाटील, मेहमूद शेख, सुनिल पाटील, भाऊराव पाटील, विनायक पाटील, विश्वनाथ चौधरी, शकील खान, अतुल पाटील, नंदकिशोर हिरोळे, विकास पाटील, अमोल महाजन, रवींद्र पाटील, सचिन महाले, किशोर पाटील, मोहन कचरे, दिनकर पाटील, संजय चौधरी, निवृत्ती महाजन, बबलू कापसे, विशाल रोटे, वसंत पाटील,दिपक धुंदले, कैलास कोळी,अतुल महाजन, प्रमोद भालेराव, चेतन राजपुत, सारंग पाटील, सौरव सपकाळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!