भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यएरंडोल

एरंडोल येथील जि.प.शिक्षकांनी 10 जॅम्बो सिलिंडर शासकीय कोविड सेंटरला दिले भेट.

Monday To Monday NewsNetwork।

कासोदा. ता.एरंडोल(ज्ञानेश्वर भोईसर )। सारे जग वर्षापासून कोरोना महामारीने ग्रासले असून चिंतातुर झाले आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. कोरोना संसर्ग वाढत आहे.सर्व शासकीय यंत्रणा दिवसरात्र या कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्याचे जिवाचे रान करीत आहे.आक्सीजन अभावी अनेक जिवाची माणस जग सोडून जात आहे. अनेक सामाजिक संस्था झोकून देऊन काम करत आहे. यातच शिक्षक कुठे मागे नाही.रेशन दुकान, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण ,चेक पोस्ट, आरोग्य विभागाची डाटा एंट्री इ.कामे शिक्षक करीत आहे.

असेच एक सामाजिक ॠण फेडण्याची यथाशक्ती हीच खरी वेळ आहे.याची जाणीव एरंडोल येथील शिक्षक समन्वय समितीला झाली.अशा कठीण प्रसंगी मा.गटविकासाधिकारी श्री.भाऊसाहेब अकलाडे व
गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील व शिक्षक संघटना समितीने मदतीचे आवाहन केल्यानंतर हा ओघ सुरू झाला.अवघ्या काही दिवसात सव्वा लाख रूपयांचा कोविड सहाय्यता निधी संकलीत झाला व या निधीतून 10 जम्बोआक्सीजन सिलिंडर प्राप्त केले.या सिलिंडर चे लोकोर्पण प्रांताधिकारी विनय गोसावी हस्ते करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे
तहसीलदार सौ.अर्चना खेतमाळीस,शाखाधिकारी आशिष मेंढे,वैद्यकीय अधिकारी डाॅ. कैलास पाटील, डाॅ.मुकेश चौधरी.तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. फिरोज शेख, गट शिक्षणाधिकारी विश्वास पाटील
शालीक गायकवाड,संजय चौधरी आदी.उपस्थित होते. या वेळी शिक्षकांनी कोविड काळात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी ग्रामीण रूग्णालय -3, कासोदा आरोग्य केंद्रास -2, तळई आरोग्य केंद्रास-2 ,रिगंणगाव केंद्रास-2 जॅम्बो सिलिंडरचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण पाटील अध्यक्ष शिक्षक समन्वय समिती यांनी केले तर आभार रवींद्र लाळगे केंद्र प्रमुख यांनी मानले, कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे सुनील येवले,(जिल्हा सरचिटणीस आस संघटना)पांडुरंग चौधरी_(जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग शास. निमशास.कर्म.वअधिकारीसंघटना ) रवि कोळी, सरचिटणीस शिक्षक सेना,प्रमोद सोनवणे अध्यक्ष शिक्षक संघ.अरूण पाटील, चंद्रकांत ठाकुर,योगेश कुबडे, विषय तज्ञ , रमेश जाधव, हेमंत जाधव , मनोहर चौधरी,रमेश सपकाळे,शरीफ शेख शंकर वारे सुधाकर माळी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!