भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

के-हाळा खुर्द ग्रामपचायती मधे पत्नी सरपंच असताना पती राजाची लुडबूड

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

के-हाळा ,ता. रावेर. भुषण महाजन। ग्रामीण भागातील महिलांना राजकारणातील आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली असली तरी रावेर तालुक्यातील के-हाळा खूर्द गावांमध्ये सरपंचपदी पत्नी विराजमान असताना पती राजा लुडबूड करीत असल्याची चांगली चर्चा रगली आहे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांच्या पतींचाच कारभार सुरू आहे. पत्नी केवळ नावाला सरपंच असून खरे सरपंच आपणच असल्यागत पतीराजांचा तोरा पाहावयास मिळत आहे.

गाव कारभारात ‘सरपंच पती’चा हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने इतर सदस्य देखील काही नी मडे टू मडे प्रतिनिधी जवळ बोलुन दाखवली….
महिलाना आरक्षण वाटा देण्याचा सरकारचा उद्देश चांगलाच साध्य झाल्याचे वरकरणी दिसते. परंतु सरपंच पतीराजांचे वाढते वर्चस्व त्यांच्या अधिकारांवर गदा आणत असून बहुतांश सरपंच महिलांना केवळ स्वाक्षरी करण्यापुरतेच विचारले जात आहे. या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत:हून पुढे सरसावल्या. गाव विकासाचा आराखडा मतदारांपुढे प्रभावीपणे मांडत प्रतिस्पर्धीविरोधात निर्भीडपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या. निवडणुकीत विजयी होऊन यातील काही जणी आता थेट गावकारभारीण बनल्या. बऱ्याच जणी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम करू लागल्या.

तालुक्यातील महिला सरपंच आणि उपसरपंचांपैकी अनेक केवळ रबरी शिक्का झाल्या आहेत. त्यांच्या पतीराजांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: सरपंच असल्याच्या थाटात वावरणे, सरपंच खुर्चीवर अतिक्रमण करणे, नागरिकांना स्वत: उत्तरे देणे, ग्रामसेवकांना धारेवर धरणे, तालुक्याच्या ठिकाणी स्वत: जाऊन सरकारी कार्यालयात ऊठबस करणे अशी कामे सुरू आहेत. पत्नी सरपंच असतानाही पतीराज स्वत:चा सरपंच म्हणूनच उल्लेख करतात. महिला सरपंचांनी गाव विकासासाठी स्वत: कामकाज करावे, अशी नागरिकांची भावना आहे. अनेकदा महिलांचे कामकाज त्यांचे पतीराज करताना पाहण्यास मिळाले आहे.

ज्या रणरागिणी कुटुंबाला उन्नत करू शकतात, त्या गावाला वेगाने पुढे नेऊ शकतात. त्यांच्या कार्यकुशलतेचा उपयोग ग्रामविकास साधण्यासाठी व्हावा. पतीराजांनी त्यांचे सामर्थ्य ओळखून त्यांचे नेतृत्वगुण विकसित करायला हवे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!