के-हाळा खुर्द ग्रामपचायत नावाला, ग्रामसेवक जाता गावाला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
के-हाळा,ता. रावेर, भुषण महाजन । कोरोनाचा काळ सुरू असला तरीही सरकारी कार्यालय सुरू आहे कमी लोकांच्या उपस्थित कामकाज सुरू आहे असे असताना रावेर तालुक्याच्या के-हाळा खुर्द ग्रामसेवक गेल्या चार ते पाच दिवसांपासुन गावात फिरकले नाहीत.
ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते, त्यातच ग्रामसेवकावर ग्रामपंचायतीची संपूर्ण जबाबदारी असते. अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले. त्यामुळे विका सकामांचा खोळंबा होतो. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे, बधनकारक असुन येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही त्यांच्यामार्फत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
ग्रामसेवकाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान त्या त्या गावी राहणे बंधनकारक आहे. मात्र या गावातील परीस्थीती वेगळी च आहे या ग्रा प मधे सरपच उपसरपच ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू असून गटविकास अधिकारी यानी सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवक याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी…अशी मागणी जोर धरत आहे ……