आंदलवाडी येथील २५ वर्षीय युवकाची रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या..
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। आंदलवाङी ता रावेर येथील तरूणाने रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली. येथील रहिवासी गोपाळ सिताराम कोळी यांचा एकुलता एक मुलगा विशाल गोपाळ कोळी या तरूणाने काल पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली. ही घटना आंदलवाङी गावातील नविन बोगद्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी घडली. विशेष म्हणजे या तरूणाचा महिनाभरापूर्वीच पूरी गोलवाडे येथील तरूणीशी विवाह झाला होता.
विशाल नेहमी सर्वाशी प्रेमाने आणि हसतमुख राहायचा त्यामुळे सर्वाचा लाडका होता. त्याच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी मृत्यूची बातमी समजल्यावर त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. आत्महत्येचे कारण समजू शकलो नाही. निभोरा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. निभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल ऊनवणे तसेच ऊप पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काॅन्टेबल आब्बास तडवी तपास करत आहेत पंचनाम्यावेळी आंदलवाडी येथील पोलीस पाटील ईश्वर कोळी,रेल्वेचे कर्मचारी तसेच आंदलवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते