भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अखिल भा.जनकल्याणकारी परिषद राज्य उपाध्यक्ष पदी–हरलाल भाऊ कोळी..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील कांडवेल येथील रहिवाशी हरलालभाऊ कोळी यांची अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की दि.16 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषद महाराष्ट्र राज्याची बैठक पनवेल (मुंबई ) येथे परिषदेचे प्रदेशअध्यक्ष सुनीलजी मेने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.तसेच संदिप भालेकर मुंबई प्रभारी,मिलिंद चिले संघटन महामंत्री महाराष्ट्र प्रदेश, सचिन भोसले मुंबई प्रदेश अध्यक्ष, आकाश कांबळे महामंत्री महा.प्रदेश या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.त्यात नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते हरीलालभाऊ कोळी यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली.त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ, प्रधानमंत्री जन औषधी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,इत्यादी श्रम योजना,या विषयावर चर्चा करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य यांचे अ.भा.ज.परिषदेचे अध्यक्ष,पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!